Thursday, 17 May 2012

आईचा ५०वा आगमन वर्षोत्सव (Anniversary)


आज झाले पन्नास वर्ष पूर्ण या कुटुंबात आमच्या आई चे,
आम्ही   म्हट्ल चला करु साजरा या दिवसा ला सर्वे मिळून,
तर आई म्हणाली काय कौतुक अता या दिवसा चे,
ते असते तर ........... ते असते तर .........
थांबून गेली रुध्द गळया ने .....
तेंव्हा ठरवल सांगू या आज तिला या लग्ना च्या दिवसा ची महती अतिसुन्दर,
प्रत्येक मुली च्या जीवनात जरी लग्ना ची ही वेळ अप्रतिम  सुन्दर,
तरी ही कुठे तरी भीति असे नवीन   माणसांशी जुळवन्याची,
जीवनात हा एक पडाव असा आहे जेंव्हा जावे लागते  मुलीला जन्म झालेल्या   घरा ला सोडुन,
जन्मा चे नाते प्रेमाचे बंधन हसले, रुसले, भांडले  तरी एक मेका ला स्वताच  क्षमा करुन परत एकच.
पण लग्नांतर चे हे नाते असते अवघड,
जोड याला घट्ट देण्या करिता मागतो हा समर्पण.
जरी आपल्या नव-याच हात धरुनी आली तु या घरात  पुढील जीवना ची वाट्चाल कराया,
तरी जास्त वेळ सहवास असतो त्याच्या कुटुंब सोबतच.
म्हणुनी लग्नाचा वाढ दिवस उत्सव आहे कुटुंबात  एका नवीन
माणसाचा आगमन उत्सव
अण आज आहे आमच्या   आईचा ५०वा आगमन वर्षोत्सव,
तर का नको करावा आम्ही हा दिवस साजरा -
जिच्या तपस्या त्याग प्रीति आणि आशिर्वादा मुळे अम्ही सर्व झालो स्टेबल,
तर देण्या करिता तिच्या या अमूल्य   यशस्वी   कर्तव्याला “लाईफ़ टाईम अचीव्हमेंट” रुपी हा मान आम्हाला वाटतो, हाच दिवस सुटेबल.                                                                                                                                              

१६/०५/२०१२                                                       सौ. भावना अमित नेवासकर 

6 comments:

  1. ऐसी सुन्दर और पावन भावनाओं की अभिव्यक्ति के लिये आपको कोटिश:साधुवाद....

    ReplyDelete
  2. भावने चे च शब्द असतील तर ते भावनाप्रधान जरूर असतील ...
    अन शेवटी भावना पोहोचल्या म्हणजे सर्व साध्य झालं .. तिथे शब्द हे गौणच राहणार ...!!
    खूपच छान भावना व्यक्त केल्या ...त्या बद्दल शाब्बास ...
    ** राजेंद्र कुलकर्णी

    ReplyDelete
    Replies
    1. सादर धन्यवाद दादा

      Delete
  3. Very nice poetry

    ReplyDelete