\\आकाशवाणी इंदौर(म.प्र.) वर प्रसारित//
संपदा
ची मुलगी, अदिती आज
घरीच होती, तिला इन्फेक्शन झाल्या मुळे, संपदा ने तिला शाळेत नव्हत पाठवल, तर अदिती कंटाळुनच, ड्राईंग काढत बसली होती, तेवढयात तिला काही तरी आठवल
आणि ती संपदा ला म्हणाली, "आई या महिन्यात तर विजया आजी चा वाढदिवस असतो न ग?" अता संपदाच तर विचारुच नका, अदिती चा तोंडुन हे ऎकुन ती मना पासुन
आंनदित झाली, आणी लागलिच तिला मीठीत घेतल अन भावुक होऊन
म्हणाली, " हो न ग बाळ, तुला छान
आठवल, ह्या महिन्यात खरच तिचा वाढदिवस असतो| अन या वर्षी च्या, वाढदिवसा ची एक गम्मत सांगु का
तुला? म्हणजे, आज
जर तुझी विजया आजी असती न तर ती पुर्ण पंचाहत्तर वर्षा ची राहिली असती”, हो, अदिती
ची विजया आजी म्हणजे संपदा च्या आईला देवाज्ञा होऊन बरेच वर्ष झाले होते, तरी पण आज ही तिन, फोटो आणि तिच्या सर्व आठवणी मधेच
अपल्या आई ला जीवंत ठेवल होत, ती जशी अपल्या आई ची पुण्यतिथी
ला आठवण ठेवुन तिच्या फोटो ला हार घालुन दिवा लावते, तसच आज ही तिचा वाढदिवस ही साजरा करत असे,
येवढ च नव्हे, तर अपल्या दोन्ही मुला -मुलीना सुद्धा त्यांच्या आजी अजोबां बद्दल सांगत असे, त्या मुळे त्या दोघाना देखील जेवढ
अपल्या राहत्या मंदा आजी च वेड आहे, तेवढच त्यांच्या दिवंगत आजी अजोबा
बद्दल ची ही माहीति पण आहे, आणि संपदा व तिचा नवरा अनिल दोघ ही सदैव जैवढ कौतुक अपल्या आजु-बाजु च्या
माणसांच करत असतात तेवढच ते अपल्या दिवगंता चे ही कौतुक, त्यांच्या “आठवणी” काढुन
करतात, त्या मुळे त्यांच्या दोघ मुलाना देखील त्या सर्वांची
माहिती आहे, कि ते कसे होते? आणि मला तर अस
वाटतय कि हेच श्रद्धे ने नेहमी अपल्या दिवंगत आप्तेष्टांची आठवण करणे त्यांचे
कृतार्थ होणे, म्हणजेच खरया अर्था ने श्राध्द करणे नाही का
झाले? असो, अता अदिती ला तर वाढदिवसा करता ग्रिटींग बनवायच नविन कार्य सापडल होत, तर ती ते बनवण्यात लागुन गेली, अन इकडे आज तिन विजया आजी
च्या वाढदिवसा ची गोष्ट काढल्या मुळे संपदा अपल्या आई सोबती च्या त्या जुन्या
आठवणीन च्या स्मृतिधारा मधे
वाहु लागली, तिला आठवल
कि तिची आई सांगत असायची. कि “ती
नवरात्री च्या दिवसातच झाली होती म्हणुनच तिच्या आई-वडिलानी
तिच नाव दुर्गा अस ठेवल होत, आणि लग्नानंतर संपदा च्या बाबां ने तिच नाव विजया केल”, पण दोन्ही नाव देखील तिच्या त्या
व्यक्तिमत्वाला शोभत असे. कारण, ती
शरीर दंड आणी मन दोन्ही कडुन सक्षम होती. ती सर्व कामात दक्ष, चपळ आणी व्यावहारीक होती. संपदा ला सर्व आठवत होत कि
कस तिच्या आईन, बाबां च्या आजार पणात ही हिम्मत न हारता खंबीर पणानी
सर्व गोष्टी ना तोंड दिल होत आणि त्यानंतर ही हॅसमुखच,
म्हणुनच तर संपदा ची आई तिची जणु हिंमत, आणी खुब जवळ ची
मैत्रीणच नव्हे तर तिची एक छान सल्लाहकार ही होती, ती कोणतीच
गोष्ट अपल्या आई ला बिना विचारता नाही करायची, इतकेच नव्हे
तर लग्ना
पुर्वी सगळे तिला
आई वेडीच म्हणायचे, कारण, तिला आई शिवाय तर झोप
सुध्दा यायची नाही, ह्या गोष्टी वरुन बहुधा दोघी आई लेकी चे
वादावाद ही व्हायचे, तिची आई तिला म्हणायची,
" अग संपदे अता तू मोठी झाली आहेस, मी तुझे लग्न करणार आहे अता, जरा वेगळ झोपण सुरुकर
" तर संपदा अगदी स्पष्ट शब्दात म्हणायची, "मी तुम्हा दोघाना सोडुन कुठेही जाणार नाही
", तेंव्हा तिची आई तिची समजुत घालायची, “अग अता अमच वय होतय, अम्ही किती दिवसा चे तुझे साथी, अन मग पुढे अमच्या गेल्यानंतर तुझे काय होणार? तु एकटी
कशी जगणार? अन अम्ही दोघ तुझ्या काळजी तच वर जाणार
की काय? ", अपल्या
आईचे इतके काळजीपुर्ण विचार एकुन, तिची चिंता दुर करण्या
करता व हा विषय टाळुन तिला हसविण्या करिता संपदा लाडवुन नाटकीपणा ने हिन्दी
चित्रपटातल हे प्रसिध्द गाण "ऎ मेरी जौहर जबी तुझे मालुम नही" म्हणायची.
तर येवढयात तर तिची आई नवी
तरुणी सारखी लाजुन हसत हसत म्हणायची. “बसग चावट कुठली”
आणी जोरात हाथ जोडुन
नमस्कार करायची तिला। असो, पण तरी ही तिच्या आई ने तिची समजुत घालुन, तिच्या स्वभावा ला शोभेल असा मुलगा शोधुन, तिच लग्न
लाऊनच दिल. पण त्यांतर
ही तिचा आई विषयी चा ओढा काही कमी नाही झाला, कारण तीच
अपल्या आई वर काही जास्त च जीव होता, तीची आई जणु तिची जीव
की प्राणच होती, त्या मुळे अपल्या आई ला जरा सा ही त्रास झालेला तिला परवडायचा नाही, आणि त्यास आईची शेवटची इच्छा ती पुर्ण नव्हती करू शकली, ह्याची खंत तिला नेम्ही साळत असे, तिच्या आई ला अखेरच्या
काळी तिच्या घरी यायचे होते, पण त्या क्षणी परिस्थितीवश ते
लागलिच काही शक्य नव्हते, तरी ही त्या दिवशी
संपदा च नव्हे तर तिचा नवरा अनिल देखिल तिच्या आई ला बोलला
होता कि, " हो आई लवकर च तुम्हाला अपल्या घरी घेऊन
जाऊ", पण दुर्दैवा
ने ती वेळच नाही आली. कारण त्याच रात्री तिच्या आई ला देवाज्ञां झाली. त्या गोष्टी चा हिच्या मना ला फार त्रास झाला होता.
कि जिच्या करता मी काही ही करायला नेम्ही तैयार असायची, तिच असी एकएकी मला सोडुन कशी काय चालली गेली? पण म्हणतातन, कोणी किती ही प्रिय असल, तरी त्याच्या सोबत, हे जग सोडुन जाता येत नाही, अण किती ही तीव्र ईच्छा
असली तरी ही जीवन, हे परत माघे नेता येत नाही अन पुढच्या
कर्त्तव्याना ही पाठ दाखवता कामाच नाही म्हणुनच भवतैक कोणवाचुन ही “जीवन” हे थांबत नसत, जीवना चा हा
प्रवाह सतत चालत असतो, इथे माणस येतात अणी जातात, राहतात तर नुसत्या आठवणी, जस दर रोज सुर्य
उगवतो आनि मावळतो च, तसच जीवनाच हे रहाटगाडग ही चालतच असत, तसच तिची आई गेल्यानंतर ही हळू हळू तिच जीवन सामान्य होऊ लागल होत. मग दोन
वर्षानंतर पहिल्यांदा तिची आई तिच्या स्वप्नात आली, अन म्हणाली,
“ संपदा. मी तुझ्या घरी येते", येवढच म्हणुन जाऊ लागली तर तिने
लागलिच अपल्या आई चा हाथ घट्ट धरुन घेतला आणि म्हणाली, "आई तु मला सोडुन परत नको न जाऊ", आणि दचकुन उठली. इकडे तिकडे पाहते तर हे काय? तिची आई तिला कुठेच
दिसेना, तिला समजल, की हे तर स्वप्न च
होत, तिला वाटल की तिच्या
आई ची अखेर ची, तिच्या घरी यायची ईच्छा, ती पुर्ण नव्हती करु शकली. ही गोष्ट नेहमी तिच्या मना ला
खटकत असे, म्हनुनच अस स्वप्न तिला पडल असेल, पण तेही इतक्या वर्षानंनतर अस स्वप्न का पडाव? अस
तिला कोडच पडल होत, असे उलट सुलट विचार तिच्या मनात
होते, तरी ही काहीस दिवसा ने अपल्या गृहस्थी च्या कामात, ती विसरु लागली, तर एके दिवशी तिला कळल. कि ती परत आई होणार आहे, तर त्याच वेळी तिला, क्षण भरा ला अस वाटल कि ते स्वप्न खर तर नव्हत, खरोखर आईच तर तिच्या स्वप्नात नव्हती आली, अण काय
जणु ती स्वत:च परत येणार आहे माझ्या जवळ, कारण कुठे तरी तीन ऎकल होत कि मना
पासुन केलेली आखेर ची ईच्छा साकार करण्या करता संपुर्णसृष्टी पण त्यात लागुन जाते. असो, संपदा च्या मनात अश्या सगळ्या आठवणीची मालिका चालत होती. तेवढ्यात च अदिती नी तिला हलवुन वर्तमानात आणल आणी अति उत्साहा ने तिनी बनवलेल ग्रिटींग दाखवु लागली आणी इथेच संपदा
ची स्मृतिधारा
थांबली।
No comments:
Post a Comment